अवैध दारू विक्रेत्यांनो आता खैर नाही; पुणे जिल्ह्यात कारवाई सुरू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

पोलिसांनी गावातील तब्बल तेरा अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई केली.

माळेगाव ः  महिलांचे अश्रू आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या लहान मुलांची वाढती संख्या विचारात घेवून पणदरेकरांनी थेट पोलिस ठाण्यासमोरच दारूचा बाजार मांडू असा इशारा दिल्याने थेट जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी वरील समस्येची गंभीर दखल घेतली. परिणामी गावातील तब्बल तेरा अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई केली.

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास

त्यामुळे संबंधितांनी दारूविक्री तर बंद केलीच, शिवाय यापुढे हा व्यवसाय न करण्याचा लेखी जबाब पोलिसांना दिला. यातील विशेष बाब म्हणजे सामाजीक कार्य़क्रते विक्रम कोकरे व दोनशे महिलांनी पोलिस अधिक्षकांचे आभार मानून पणदरे गावाला सदिच्छा भेट देण्याचे निमंत्रण दिले.

पणदरे (ता. बारामती) ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे १० हजार पेक्षा अधिक आहे. अर्थात हे तालुक्यातील सर्वार्थाने महत्वाचे गाव म्हणून पुढारलेले आहे. ही प्राप्त स्थिती असताना अलीकडच्या काळात या गावात अवैध दारू व्यवसाय चांगलाच फोपावला होता. विशेषतः झोपडपट्टी भागात अनेक कुटुंब उध्वस्त झाल्याची उदाहरणे पुढे आली आहेत. त्यातील मोठा धोका म्हणजे शाळकरी मुलेही व्यसनाधीन होत होती. या समस्येमुळे गावाचे गावपण टिकण्यास बाधा पोचत होती.

परिणामी येथील समाजिक कार्य़कर्ते विक्रम कोकरे यांनी गावातील कायमची दारूबंदी होण्यासाठी आज पणदरे पोलिस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. त्या आंदोलनाला दोनशे महिलांनी पाठींबा दिला होता. अर्थात तसे सह्यांचे निवेदन पोलिसांना दिले होते. याची दखल घेत पोलिस अधिक्षक देशमुख यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांना कडक कारवाईचे आदेश दिले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहाजिकच वरिष्ठ पातळीवर यंत्रणा हलल्यानंतर पणदरे गावातील दारू विक्रत्यांची पळताभुई थोडी झाली. गावात तब्बल १३ व्यवसायिकांनी आपला धंदा बंद केला तसेच यापुढे हा व्यवसाय करणार नसल्याचा जबाब पोलिसांना दिला. यापुढे सदरची कारवाई अशीच पुढे चालू राहिल व गावात दारूविक्री होणार नाही. हा धंदा करण्याचे कोणी धाडस दाखविल्यास त्याचावर तडीपारीसारखी कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनकर्ते कोकरे यांनी आजचे आंदोलन मागे घेतले. 

चोरट्या मार्गाने दारू विक्री करणाऱ्यांनो खबरदार, यापुढे पणदरेसह वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय करणारे सापडल्यास त्यांची गय केली जाणार नाही. दोनपेक्षा अधिक दारू विक्रीचे गुन्हे दाखल असणाऱ्यांविरुद्ध तडीपारीच्या कारवाईचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविले जाणार आहेत. कोकरेंसह आंदोलनकर्त्यांची वरील समस्येबाबत पुरेशी चर्चा झालेली आहे. आजवर केलेल्या पोलिस कारवाईचा आणि यापुढे होणाऱ्या कारवाईचे स्वरूप कसे असेल, याची माहिती संबंधितांना दिल्याने आजचे आंदोलन स्थगित झाले.-सोमनाथ लांडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पणदरे गावच्या हद्दीतील अवैध दारूविक्री सध्यातरी पुर्णतः बंद झाली आहे. यापुढील काळात अशाच पद्धतीचे वातावरण राहण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्वपुर्ण ठरणार आहे. त्यामध्ये पोलिस प्रशासनाने कामात हायगय केल्यास  पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असे लेखी पत्र पोलिस प्रशासनाला दिले आहे.-सामाजिक कार्य़कर्ते, विक्रम कोकरे
 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against illegal traders in Pandare area