esakal | आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास
sakal

बोलून बातमी शोधा

Use of digital library by students

महाविद्यालयातील 862 विद्यार्थ्यांना, शिक्षक आणि नॉन-टिचिंग स्टाफ यांना ती लायब्ररी खुली झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची क्रमिक आणि संदर्भ पुस्तके उपलब्ध झाली. डिजिटल साहित्ये, ई-पुस्तके, ऑडिओबुक, व्याख्यानमाला,  सिम्युलेशन साधने, थीसिस, अहवाल, लेख, जर्नल्स, प्रश्नपत्रिका  अशा विविध प्रकारची एकूण अकरा भाषांमध्ये पाच कोटीहून अधिक स्रोत उपलब्ध आहेत. 'जेईई'चा अभ्यास करणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा संसाधने उपलब्ध आहेत, असे प्राध्यापक ज्योती ढाणके यांनी सांगितले

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : सध्या ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहे. पण विद्यार्थी ग्रंथालयात जाऊ शकत नाही. त्यावर पुण्याजवळील लवळे येथील भारती विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजने मार्ग काढत सर्व विद्यार्थ्यांचे आयआयटी खरगपूरच्या नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (एनडीएलआय) ऑनलाईन लायब्ररीशी रजिस्ट्रेशन करून घेतले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविद्यालयातील 862 विद्यार्थ्यांना, शिक्षक आणि नॉन-टिचिंग स्टाफ यांना ती लायब्ररी खुली झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची क्रमिक आणि संदर्भ पुस्तके उपलब्ध झाली. डिजिटल साहित्ये, ई-पुस्तके, ऑडिओबुक, व्याख्यानमाला,  सिम्युलेशन साधने, थीसिस, अहवाल, लेख, जर्नल्स, प्रश्नपत्रिका  अशा विविध प्रकारची एकूण अकरा भाषांमध्ये पाच कोटीहून अधिक स्रोत उपलब्ध आहेत. 'जेईई'चा अभ्यास करणा-या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा संसाधने उपलब्ध आहेत, असे प्राध्यापक ज्योती ढाणके यांनी सांगितले

संगणक विभागाच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी संस्कार म्हस्के म्हणाला, ''लॉकडाऊन सुरू असतानाही या डिजिटल लायब्ररीमुळे पुस्तकांची कमतरता भासली नाही. तसेच अभ्यासक्रम व्यतिरिक्त इतरही पुस्तकांचे ज्ञान आम्ही आत्मसात करू शकलो. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यामुळे मला सर्व पुस्तके उपलब्ध झाली." 

वाघोलीतील विकासकामांना निधी द्या; वाचा, कोणी केली मागणी?

तृतीय वर्षाची विद्यार्थीनी महिमा नाईक यांच्या म्हणण्यानुसार, 'एनडीएलआय' वापरल्यामुळे मला तांत्रिक क्षेत्रात बरीच पुस्तके आणि नियतकालिकांमध्ये ऑनलाइन प्रवेश मिळाल्याने मला लायब्ररी वापरण्यास खूप मदत झाली. यामुळे चालू असलेल्या संशोधनात माझ्यामध्ये एक कुतूहल निर्माण झाले आहे. तसेच, ऑनलाइन व्याख्यानांमधील शंका स्पष्ट करण्यास मदत केली आहे. विषयांचा सखोल अभ्यास करण्यास मदत झाली आहे.

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

loading image