मद्य विक्रेत्यांनो सावधान ! तुमच्यावरही होऊ शकते... 

Liquor1
Liquor1

हडपसर : जिल्हा अधिकारी व पोलिस आयुक्त आणि शासकीय आदेशाचा व मार्गदर्शक तत्त्वांचा भंग करून मानवी जीवितास धोकादायक असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग पसरविण्याची कृती केल्याने मद्याच्या दुकानांवर हडपसर पोलिसांनी कारवाई केली. मद्य विक्री करणाऱ्या दुकानांच्या मालकांनी ग्राहकांत शारीरिक डिस्टन्सिंग न ठेवता तसेच थर्मल स्क्रीनिंगचा वापर न करता आणि मास्कचा वापर न करता लोकांची गर्दी जमवल्याने हे गुन्हे दाखल केले आहेत. 

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोराना विषाणूचा संसर्ग पुणे शहरात गतीने पसरत आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे. जिल्हा अधिकारी तसेच पोलिस आयुक्त यांच्या आदेशान्वये शर्ती व अटीचे पालन करून मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, त्यांचे पालन न केल्याने दुकानावर कारवाई करण्यात आली आहे.' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

हडपसर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील शनी मंदिराजवळील रोहित वाईन्स, ससाणेनगर येथील एम. आर. वाईन्स, आकाशवाणी येथील एशियन वाईन्स, रासकर चौकातील एस. एस. घुले वाईन्स, गाडीतळ येथील अजंठा वाईन्स, राजधानी वाईन्स, कुणाल वाईन्स या दुकान चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com