
पुणे - पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले आहे. डॉ. कुलकर्णी यांची बदनामी थांबवून बॅनर लावणाऱ्यांवर कारवार्इ करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.