esakal | इंदापुरातील वनजमिनीवरील घरांबाबत घेतलाय हा निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

kalas

इंदापूर तालुक्‍यामध्ये वन विभागाचे सुमारे पंधरा हजार एकर क्षेत्र आहे. यापैकी शेकडो एकर क्षेत्रावर ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहे. 

इंदापुरातील वनजमिनीवरील घरांबाबत घेतलाय हा निर्णय...

sakal_logo
By
सचिन लोंढे

कळस (पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील वनजमिनीवर राहण्यासाठी घर बांधून केलेले अतिक्रमण तूर्तास हटविणार नसल्याचे स्पष्टीकरण तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिले.

घाबरू नका, तुमच्यासाठी येथे नोकरी उपलब्ध आहे..

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्‍यातील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या केलेल्या कार्यवाहीत सुमारे 110 एकर वनजमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत सुमारे 1200 एकर वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यात वनविभागाला यश आले आहे. 

लाॅकडाउनमध्ये 35 कोटींची शेतमाल तारण कर्जे उपलब्ध

इंदापूर तालुक्‍यातील लासुर्णे, पिंपळे, राजवडी, वरकुटे खुर्द, गोखळी आदी गावांतील सुमारे 110 एकर वन क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र, यामध्ये असलेल्या घरांना अभय देण्यात आले आहे.

ग्रामपंचायतींकडील थकबाकी मुद्रांकमुळे वसूल

तालुक्‍यामध्ये वन विभागाचे सुमारे पंधरा हजार एकर क्षेत्र आहे. यापैकी शेकडो एकर क्षेत्रावर ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहे. काही ग्रामपंचायतींनी वन जमिनीवर ग्रामस्थांनी विनापरवानगी घर बांधून केलेल्या अतिक्रमणाची आठ "अ' सदरी नोंद केली आहे. मात्र, हे बेकायदेशीर असून, वनजमिनीवरील घरांचे ग्रामपंचायतींनी नोंद घेऊ नये, असे आवाहन तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी केले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या कारवाईमध्ये सहायक वनसंरक्षक संजय मारणे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्यासह पाच तालुक्‍यातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी सहभागी झाले होते. 

इंदापूर तालुक्‍यातील 63 गावांमध्ये वनक्षेत्र विस्तारले आहे. काही ठिकाणी महसूल विभागाने वन जमिनींचे वाटप केले आहे. वाटप केल्यानंतर उर्वरित क्षेत्रावर संबंधितांनी अतिक्रमण केले आहे. या जमिनीवरील अतिक्रमण काढून या ठिकाणी वृक्ष लागवडीचे काम केले जाणार आहे. 
 - राहुल काळे
वनपरिक्षेत्र अधिकारी, इंदापूर तालुका 

loading image