नगररोड परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून नगररोड, खराडी बायपास, संघर्ष चौक, जुना मुंढवा रोड येथे पथारी व्यावसायिक, फेरीवाले, खाद्य विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

रामवाडी (पुणे) : नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून नगररोड, खराडी बायपास, संघर्ष चौक, जुना मुंढवा रोड येथे पथारी व्यावसायिक, फेरीवाले, खाद्य विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

चौथ्या टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली तसे नागरिक घराबाहेर पडू लागले. काहींनी नोकरी गेल्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. यातील काही व्यावसायिकांनी व्यवसाय रस्त्यावरच थाटल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत होता. रहदारीला अडथळा ठरणाऱ्या विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत स्थानिक रहिवासी दीप्ती खांडके म्हणाल्या, चंदननगर, गणेशनगर, खराडी बायपास रोड येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नवीन व्यावसायिकांनी विविध व्यवसाय सुरू केले आहे. त्यामुळे इथे खरेदी करणारांची गर्दी होत असल्याने विक्रेता व खरेदीदार या दोघांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहे. रस्त्यावर, पथपदावर, विक्रेत्यांनी भाजीपाला, फुले-फळे इतर विक्री व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने त्यांच्या कारवाई करण्यात आली. 
-सुभाष तळेकर, अतिक्रमण निरीक्षक, नगररोड क्षेत्रीय कार्यालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on encroachments in Nagar Road area