पुणे : बऱ्हाटे, जगतापसह इतरांवर मोक्कांतर्गत कारवाई होणार?

पुणे : बऱ्हाटे, जगतापसह इतरांवर मोक्कांतर्गत कारवाई होणार?

पुणे : बांधकाम व्यावसायिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी कोथरूड आणि समर्थ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता आणि बडतर्फ पोलिसासह त्यांच्या टोळीतील इतरांवर मोक्कांतर्गत कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण नऊ जणांवर फसवणूक, खंडणी, धमकावल्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. त्यातील सहाजण सध्या अटकेत आहेत. बडतर्फ पोलिस शैलेश हरिभाऊ जगताप, (वय 49, रा. विश्वकर्मा इमारत, भवानी पेठ), परवेज शब्बीर जमादार, पत्रकार देवेंद्र फूलचंद जैन (वय, 52, प्रियदर्शनी सोसायटी, गणेशमळा, सिंहगड रोड), दीप्ती आहेर (वय 34, रा. व्हीला विस्टा अपार्टमेंट, बावधन), जयेश जितेंद्र जगताप (वय 30, रा. घोरपडे पेठ) आणि अमित विनायक करपे (वय 33, रा. सोमवारपेठ) यांना अटक करण्यात आली आहे. तर माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा), अमोल सतीश चव्हाण (रा. चव्हाणवाडा, कोथरुड) आणि प्रकाश फाले (रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून ते फरार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समर्थ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींची 20 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर कोथरुड पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात अटक झालेले मात्र समर्थ पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात वर्ग न केलेले आरोपी सध्या जामिनावर आहेत. 

कोथरूडमधील गुन्ह्यात बऱ्हाटे याने कट रचल्याचे तपासातून समोर आले आहे. तर समर्थमधील गुन्ह्यात कोणाची काय भूमिका आहे? याचा पोलिस तपास करत आहेत. बऱ्हाटे आणि चव्हाण यांच्यावर आतापर्यंत शहरातील विविध पोलिस ठाण्यात अनुक्रमे सहा व पाच गुन्हे दाखल आहेत. बडतर्फ पोलिस जगताप आणि जमादार यांनी पोलिस दलात कार्यरत असताना केलेल्या गैरी कारभारामुळे त्यांची खात्यातून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे.

आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता : 

संबंधित आरोपींविरोधात दोन गुन्हे दाखल झाल्याने यांनी ज्यांनी फसवणूक केली आहे तसेच धमकावले आहे, असे नागरिक आता पुढे येऊ शकतात. त्यामुळे या आरोपींवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर ही कारवाई होऊ शकते. तसे झाल्यास त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करणे पोलिसांना आणखी सोपे होणार आहे.

जैन यांच्या विरोधात आतापर्यंत केवळ दोनच गुन्हे दाखल आहेत. समर्थ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांची काय भूमिका आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जरी त्यांच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई झाली तरी ती पुढे टिकणार नाही. 

- ऍड. प्रताप परदेशी, बचाव पक्षाचे वकील

दीप्ती आहेर यांच्यावर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. यापूर्वी त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकरणात दोषारोपपत्र दाखल नाही. मुळात त्या स्वतः पीडित महिला असून त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.

- ऍड. विजयसिंह ठोंबरे, बचाव पक्षाचे वकील 

वरिष्ठ पातळीवर निर्णय :

कोणत्या आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करायची हे ठरवण्याचा अधिकार वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना आहे. त्यामुळे मोक्काबाबत काय करायचा याचा निर्णय ते घेतील? असे या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com