Pune Crime : शेवाळेवाडीतील अनधिकृत प्लॉटिंग रोखण्याची शेतकरी हक्क कृती समितीची मागणी

गावाचा सुनियोजित विकास व्हावा, या दृष्टीने शेवाळवाडीमधील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बांधकाम व्यवसायिकांनाच विकल्या आहेत
action of farmers committee demands to stop unauthorized plotting Shewalewadi crime land
action of farmers committee demands to stop unauthorized plotting Shewalewadi crime land sakal

मांजरी : गावाचा सुनियोजित विकास व्हावा, या दृष्टीने शेवाळेवाडीमधील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बांधकाम व्यवसायिकांनाच विकल्या आहेत. मात्र, सध्या या जमिनीवर अनाधिकृत प्लॉटिंग होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

त्यामुळे असे अनाधिकृत प्लॉटिंग रोखण्याची मागणी येथील "शेतकरी हक्क कृती समिती' ने महसूल विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा सुविधांवर ताण येऊ नये, त्या पुरविण्यात अडीअडचणी येऊ नयेत तसेच बकालपणा वाढू नये, या दृष्टीने येथील शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या जमिनी मान्यताप्राप्त बांधकाम व्यवसायिकांनाच विकासासाठी विकली होती.

यापुढेही दिल्या जाणाऱ्या जमिनी अशाच पद्धतीने अधिकृत विकसकांना देण्याचा किंवा स्वतः विकसित करण्याचा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. मात्र काही विकसकांकडून येथील शेकडो एकर जमिनीवर अनाधिकृत प्लॉटिंग व्यवसाय सुरू केला आहे. भविष्यात अनाधिकृत बांधकामे होण्याचाही धोका आहे.

त्यामुळे गावाच्या सुनियोजित विकासाला अडथळा येऊन बकालपणा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार शेतकरी हक्क कृती समितीचे सदस्य संजय शेवाळे, विक्रम शेवाळे, गणपत शेवाळे, सुनिल शेवाळे, सुमित शेवाळे, सचिन शेवाळे, नितीन शेवाळे, किरण शेवाळे, अमर शेवाळे, विठ्ठल शेवाळे, प्रशांत शेवाळे, गणेश शेवाळे,सुरेश शेवाळे आदींनी केली आहे.

समितीने याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह महसूल विभाग व पीएमआरडीए अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. शेवाळेवाडी गाव हे नुकतेच पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

गाव महापालिकेत गेल्यानंतर येथे अधिकाधिक सुनियोजित विकास होणे अपेक्षित आहे. मात्र, काही लोकांकडून या भागात शेती क्षेत्रावर बेकायदेशीरपणे तुकडे पाडून प्लॉटिंग केले जात आहे. संबंधित सर्व यंत्रणांनी याकडे लक्ष देऊन येथील असे अवैध प्लॉटिंग तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी हक्क कृती समितीने दिला आहे.

शेवाळेवाडी गावात पूर्वीपासूनच सुनियोजित विकासाला महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे यापुढेही गावच्या परिसरात बकालपणा येणार नाही, यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी शेतजमीनीचे बेकायदेशीर प्लॉटिंग होऊ न देण्याचा निर्धार केलेला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांसह महसूल विभागाशी संबंधीत अधिकाऱ्यांना आम्ही असे बेकायदा प्लॉटिंग रोखण्याची मागणी केली आहे.'

- संजय शेवाळे, विक्रम शेवाळे, स्थानिक शेतकरी

"शेवाळेवाडी येथील शेतकऱ्यांची बेकायदेशीर प्लॉटिंगबाबत तक्रार आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही केली जाईल.'

किरण सुरवसे, तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com