
पुणे - शहरातील रस्त्यांवर, पादचारी मार्गांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ‘आर्थिक हितसंबंध’ अधिक घट्ट झाल्याने कारवाई केली जात नाही. याविरोधात पुणेकरांनी त्यांचा संताप व्यक्त केला.