esakal | कोरोना संदर्भातील नियमांचा भंग केल्याप्रकरणी भिगवण परिसरातील चौदा दुकानांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना संदर्भातील नियमांचा भंग केल्याप्रकरणी भिगवण परिसरातील चौदा दुकानांवर कारवाई

कारवाई केलेली दुकाने पुढील सात दिवसांसाठी सील करण्यात आली आहेत. प्रशासनाने सुरु केलेल्या धडक कारवाईमुळे बाजारपेठेतील गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोना संदर्भातील नियमांचा भंग केल्याप्रकरणी भिगवण परिसरातील चौदा दुकानांवर कारवाई

sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता महसुल व पोलिस प्रशासनही सध्या अॅक्शन मुडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने लागू केलेल्या निर्बधांचा भंग केल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील चौदा दुकांनावर कारवाई करण्यात आली असून, ही दुकाने पुढील सात दिवसांसाठी सील करण्यात आली आहे.

पुण्यात मिनी लॉकडाऊन तरीही कोरोनाचा कहर; रुग्णवाढीचा आकडा चिंताजनक​

राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. याबाबत प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही काही अस्थापनांकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची बाब येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने इंदापूर तहसिलदार यांचे निदर्शनास आणून दिली होती. भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने व पोलिस कर्मचारी सुचनेवरुन भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल पंचरत्न, चाईनिज सेंटर, ए वन किराना स्टोअर्स, मशीनरी अॅँड इलेक्ट्रीकल्स, पद्मावती रसवंती गृह, कृष्णा स्विटस्, हॉटेल ज्योती, अमोल ट्रे़डर्स, भाजी स्टॉल, हॉटेल यशोदिप, श्रीनाथ भेळ, शिवमल्हार भजी स्टॉल, ललवाणी ब्रदर्स आदी चौदा दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, ही दुकाने पुढील सात दिवसांसाठी सील करण्यात आली आहेत. प्रशासनाने सुरु केलेल्या धडक कारवाईमुळे बाजारपेठेतील गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली आहे.दरम्यान प्रशासनाच्या आदेशानंतर भिगवण व परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. अचानक बंदचा आदेश आल्यामुळे व्यावसायिकांनी नाराजीही व्यक्त केली.

‘जीएसटी’चा उद्देशच नष्ट : सर्वोच्च न्यायालय​

याबाबत येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशाची काटेकोरपणे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. सध्या चौदा दुकानदारांविरुध्द प्राथमिक कारवाई केली असून, त्याअंतर्गत ही दुकाने सात दिवसांसाठी सील करण्यात आली आहे. याच दुकानदारांनी पुन्हा नियमभंग केल्यास महामारी संपेपर्यंत ही दुकानांवर कारवाई होईल याची नोंद घ्यावी.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image