
कडूस : कडूस (ता. खेड) येथे बुधवारी पोलिसांनी अकरा भाजी विक्रेत्यांवर सोशल डिन्स्टसिंगच्या योग्य ती काळजी न घेतल्याबाबत खटले दाखल केले. सोशल डिन्स्टसिंगच्या पालनाबाबत ग्रामस्थांच्या विनंत्या व विनवण्याना न जुमानणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच गजबजलेल्या भाजीबाजाराच्या जागी सुनसान शांतता पसरली होती.
कडूस येथे बुधवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी एसटी स्टँड चौकात भाजीबाजार भरला होता. यात अक्षरशः सोशल डिस्टनसिंगचे धिंडवडे निघाले. गर्दीमुळे या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे कोणतेच नियम पाळले जात नव्हते. भाजीविक्रेते एकमेकांना खेटून दुकान मांडून बसले होते. ग्राहकांची सुद्धा मोठी गर्दी होती.
बाजारातील अनेकांनी तोंडाला साधे मास्कसुद्धा बांधलेले नव्हते. सोशलडिस्टनसिंगच्या पालनाबाबत ग्रामसेवक बाळासाहेब माने, पोलिस पाटील सुशील पोटे, बाळासाहेब बोंबले, प्रताप ढमाले, मारुती जाधव, बाळासाहेब धायबर, विशाल ढमाले व तरुणांनी प्रयत्न केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बाजारात फिरून भाजी विक्रेत्यांना व ग्राहकांना सोशल डिस्टनसिंगच्या पालनासाठी अक्षरशः विनवण्या केल्या. मनधरणी केली. वारंवार विनवण्या करूनही ऐकत नसल्याने काही सजग नागरिकांनी उपविभागीय अधिकारी संजय तेली व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांना कळविले. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात गावात पोलीस पथक दाखल झाले.
दरम्यान, या पथकाने महसूल व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. दोन ग्राहकांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्यासाठी सूचना न देणे, तशी व्यवस्था न करणे, गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना न केल्याप्रकरणी अकरा भाजी विक्रेत्यांवर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.