अटक न करण्यासाठी दुकानदाराकडे `त्यांनी` मागितली चक्क लाच मग...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

दुकानदारावर केलेल्या कारवाईत त्यास अटक न करण्यासाठी 50 हजार रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या पुणे पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्यासह दोघावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

पुणे : दुकानदारावर केलेल्या कारवाईत त्यास अटक न करण्यासाठी 50 हजार रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या पुणे पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्यासह दोघावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.

पुणेकरांनो, दुपारनंतर छत्री घेऊनच बाहेर पडा!

विलास मोहन तोगे (वय 39) असे पोलिस कर्मचाऱ्याचे तर बाळासाहेब चव्हाण असे खासगी व्यक्तिचे नाव आहे. तोगे हा वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. खंडणी विभागाच्या पथकाने काही दिवसांपूर्वी तक्ररदाराच्या दुकानावर कारवाई केली होती. तसेच त्यांनी काही प्रमाणात मुद्देमालही जप्त केला होता. दरम्यान, या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, चव्हाणच्या मध्यस्थीने तोगे याने तक्रारदाराशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणात तक्रारदाराला अटक होऊ नये आणि त्याचा मुद्देमाल त्यास परत देण्यासाठी तोगे याने 50 हजार रूपयांची लाच मागितली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यापैकी 38 हजार रूपये त्याने यापूर्वीच स्वीकारले. तर 12 हजार रूपये देण्यासाठी त्याच्याकडुन तगादा लावला जात होता. त्यानंतर तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे तक्रार केली. या प्रकरणाची पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे व अपर पोलिस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक प्रतिभा शेडगे, पोलिस निरीक्षक सुनिल क्षिरसागर, पोलिस कर्मचारी चिमटे, कादभाणे व राऊत यांच्या पथकाने ही  21 मे रोजी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात सापला रचून ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action taken against two including police demanding bribe of fifty thousand rupees in pune