बंदी असतानाही उडविले बाजारात फटाके अन् घडले...

Action taken against for using firecrackers to celebrating birthday in market yard pune.jpg
Action taken against for using firecrackers to celebrating birthday in market yard pune.jpg

मार्केट यार्ड : बाजार समितीमधील गाळ्यावर फटाके वाजवण्याची बंदी आहे. तरीही फळ विभागातील एका गाळ्यावर वाढदिवस साजरा करून फटाके उडवले. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने तत्काळ संबधित अडत्याचा परवाना निलंबित करण्याची नोटीस बजावली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी फळ विभागाचे विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी सांगितले, ''संबधित अडत्याला ताबडतोब परवाना का निलंबित करू नये म्हणून नोटीस पाठविली आहे. बाजार समितीचे प्रशासक यांच्या आदेशाने संबंधित अडत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.''

बाजार समितीच्या नियमानुसार भाडे पट्यातील कलम २५ नुसार भाडेपट्टा धारक अडते/ व्यापारी यांनी या जागेत कोणत्याही प्रकारचा ज्वालाग्राही पदार्थ साठवून ठेवायचा अथवा अतिशबाजी करायची नाही. असे दिसून आल्यास संबधितावर कारवाई करण्यात येईल. या नियमानुसार बाजारातील हेंद्रे लेमन कंपनी, गाळा क्रमांक १६७ यांना नोटीस दिली आहे. 

वाढदिवसानिमित्त गाळ्यासामोर फटाके वाजविले आहेत. सदरचे कृत्य हे बाजार समितीच्या कायदा नियम व उपविधीमधील तरतुदींचा भंग आहे. त्यामुळे बाजार समितीने १०१९-२० करिता नियमित शेतीमालाच्या ठोक व्यवसायाकरिता अडत्याचा परवाना का निलंबित करू नयेची नोटीस बाजार समितीने बजावली आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी समितीचे प्रशासन बी जे. देशमुख यांच्या उपस्थित फटाके उडवले होते. त्यावेळी प्रशासनाने फटाके उडविणाऱ्या संबधित आडत्यावर कारवाई केली होती. त्यामुळे या घटनेत कारवाई होणार की नाही याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com