esakal | गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

police

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात प्रशासन अॅक्शन मोडमध्ये

sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील

मंचर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात सोमवारी (ता.१९) मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द आदी मोठ्या गावांमध्ये पोलीस अधिकारी व पोलीस पथके रस्त्यावर उतरली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवण्यास सुरुवात केली आहे. व विनाकारण फिरणाऱ्यांकडून 12 हजार रूपयांचा व विनामास्क फिरणाऱ्यां ६७ व्याक्तीकडून ३३ हजार ५०० रुपये दंडाची रक्कम मंचर पोलिसांनी वसूल केली आहे. वळसे पाटील यांनी रविवारी (ता.१८) मुंबईहून ऑनलाइन पद्धतीने मंचर येथे झालेल्या कोरोना आढावा बैठकीत आंबेगाव तालुक्यात कोरोना संसर्ग वेगाने फैलावत आहे. कामाशिवाय फिरणाऱ्यांना शिस्त लावा. रस्त्यावरची गर्दी कमी करा. पोलिसांनी प्रभावीपणे काम करावे. असे आदेश दिले होते. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही आंबेगाव तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या होत्या. त्यानुसार मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी मंचर, अवसरी खुर्द, घोडेगाव, गावडेवाडी, पिंपळगाव, अवसरी फाटा, डिंभे या भागात नाकेबंदी करून रस्त्याने ये- जा करणार्यांची चौकशी सुरु केली आहे.

हेही वाचा: जुन्नर : ट्रॅक्टर अपघातात वडील-मुलाचा दुर्दैवी मृत्यू

लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु आहे. अत्यावाश्यक सेवा सोडून दुकानेही बंद आहेत. पण काहीजण मेडिकल स्टोअर किंवा दूध खरेदीसाठी जातो, असा बहाणा करून गावभर फिरत असतात. त्यासाठी पोलिसांनी मंचर शहरात ठिकठिकाणी बॅरिकेट लावलेले असून तपासणी नाके सुरू केले आहेत. प्रत्येकाचे रस्त्यावर येण्याचे कारण विचारले जाते. विशेषता मोटर सायकलस्वार विनाकारण फिरत असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या फिरण्यावर निर्बंध लावण्याचे काम पोलीस सध्या करत आहेत. कामाव्यतिरिक्त विनाकारण फिरत असलेल्यांच्या विरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे हे स्वतः रस्त्यावर उतरले आहेत प्रथम त्याची शांततेने चौकशी करतात पण तो चुकीची माहिती देत आहे असे आढळून आल्यानंतर थेट त्याच्याकडे दंडाची पावती दिली जाते.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजाच्या वेळा बदलल्या

दंडात्मक कारवाई झाल्यनंतर दुसर्यांदा काम नसतानाही रस्त्यावर आल्यास संबंधिताच्या विरोधात गुन्हा दाखल करतील लागेल. असा इशारा देण्यासही कोरे विसरत नाहीत. पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलल्यामुळे रस्त्यावर फिरणार्या बिनकामाच्या मंडळीमध्ये खळबळ उडालेली आहे.

गेल्या काही दिवसात मंचर पोलिसांनी कोरोना पार्श्वभूमीवर एक लाख २२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. त्यामध्ये तीन मंगल कार्यालयांकडून शासनाच्या नियमाचे उलंघन केल्याने ६० हजार रुपये वसूल केलेल्या दंड रकमेचा समावेश आहे. पारगाव लोणी, पेठ, कळंब, अवसरी बुद्रुक, सातगाव पठार, महाळुंगे पडवळ, रांजणी परिसरातही फिरते पोलीस पथक कार्यरत केले आहे.- सुधाकर कोरे, पोलीस निरीक्षक मंचर पोलीस ठाणे.