पुणे - जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत प्रमाणपत्र तपासणीत ४६ शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण हे ४० टक्क्यांहून कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे जिल्हा परिषदेने निश्चित केले आहे. अद्याप ३१४ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी शिल्लक आहे.