खुनी हल्ला करून दहशत पसरविणाऱ्या टोळीविरुद्ध "मोका' अंतर्गत कारवाई

दहशत निर्माण करणाऱ्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे.
Gang war in nashik
Gang war in nashikSakal

पुणे : येरवडा परिसरामध्ये जबरी चोरी, नागरीकांवर खुनी हल्ला, वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आदेश दिला. त्यानुसार आत्तापर्यंत "मोका'अंतर्गत 47 कारवाया करण्यात आल्या.

Gang war in nashik
पवारांच्या मित्राकडून मोदींचे कौतुक

प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या कसबे, शिवराज मनोज मिरगळ, आशुतोष आडागळे, तेजस हरिदास दनाने, विवेक ऊर्फ शिवम दुर्गेश सिंग, कुणाल ऊर्फ सोनबा संजय चांदणे, संदिप सुग्रीव घोडेस्वार, रोहित ऊर्फ विनायक प्रमोद भेंडे, दिपक दत्तु मदने, करण भारत सोनवणे, महेश सुनील कांबळे, अजय युवराज कसबे, अनिकेत अनंद कसबे, महेश सरवदे अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. गुड्ड्या कसबे हा टोळीप्रमुख आहे. त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने एक ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ येरवड्यातील लक्ष्मीनगर येथे तिघांवर जीवघेणा हल्ला केला. त्याचवेळी एका आरोपीने तेथील रहिवाशास दगड मारून त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच तलवार, कोयते, पालघन अशी हत्यारे घेऊन नागरीकांच्या घरांवर दगडफेक केली.

Gang war in nashik
बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मदिवशी मोदींच्या मराठीतून शुभेच्छा

तसेच नागरीकांच्या घरातील सामानही फेकून दिले. याबरोबरच रस्त्याच्याकडेला लावलेल्या वाहनांची तोडफोड करीत दहशत निर्माण केली. गुड्ड्या कसबे हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने संघटीतपणे टोळी निर्माण करून त्याद्वारे खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्रे बाळगणे यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांद्वारे नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित आरोपींवर "मोका'अंतर्गत कारवाई करावी, याबाबतचा प्रस्ताव येरवडा पोलिस ठाण्याकडून परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com