esakal | रवींद्र बऱ्हाटेसह साथीदारांविरुद्ध चतुःशृंगी पोलिसांकडूनही "मोक्का'अंतर्गत कारवाई

बोलून बातमी शोधा

Action against Ravindra Barhate and his accomplices by Chathushrungi police under Mocca}

पर्वतीमधील एक भुखंड बळकाविण्याच्या उद्देशाने वृद्ध महिला व तिच्या कुटुंबीयांना धमक्‍या व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात यापुर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune
रवींद्र बऱ्हाटेसह साथीदारांविरुद्ध चतुःशृंगी पोलिसांकडूनही "मोक्का'अंतर्गत कारवाई
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यापाठोपाठ आता चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातही महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पर्वतीमधील एक भुखंड बळकाविण्याच्या उद्देशाने वृद्ध महिला व तिच्या कुटुंबीयांना धमक्‍या व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात यापुर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, बिबवेवाडी व धनकवडी), बडतर्फ पोलिस शैलेश हरीभाऊ जगताप, बडतर्फ पोलिस परवेझ शब्बीर जमादार (दोघेही रा. सोमवार पेठ पोलिस वसाहत), देवेंद्र फुलचंद जैन (रा. प्रियदर्शनी सोसायटी, सिंहगड रोड), प्रशांत पुरूषोत्तम जोशी (रा.कृष्णलीला हौसिंग सोसायटी, कोथरुड), प्रकाश रघुनाथ फाले (रा.हिरकणी सोसायटी, जुनी सांगवी), विशाल गजानन तोत्रे (रा. पोलिस वसाहत, शिवाजीनगर), संजय प्रल्हाद भोकरे (रा. धनंजय सोसायटी, कोथरुड) व अन्य आरोपींविरुद्ध "मोक्का'अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पाषाण येथे राहणाऱ्या 68 वर्षीय फिर्यादीची पर्वतीमधील सहकारनगर येथे चार एकरहून अधिक जमीन आहे. फिर्यादींचा संबंधीत जमीनीचा ऋषीकेश बारटक्के याच्याशी व्यवहार झाला होता. त्यानंतर आरोपींनी संबंधीत जमीनीसंदर्भात महसुल दफ्तरी हरकत घेऊन त्यांच्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी व बारटक्के यांच्या व्यवहाराबाबत पत्रकार परिषद घेऊन त्यांची बदनामी केली. त्याचबरोबर त्यांच्या घरी हस्तक पाठवून जमीन बळकाविण्याच्या उद्देशाने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना वेळोवेळी धमक्‍या देण्याबरोबरच खोटे गुन्हे दाखल करुन आयुष्यभर जेलमध्ये सडविण्याचीही धमकी आरोपींनी दिली. याप्रकरणी फिर्यादींनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

दरम्यान, बऱ्हाटे हा त्याच्या टोळीमध्ये इतर सदस्यांना बरोबर घेत बऱ्हाटे याच्या सांगण्याप्रमाणे त्याची टोळी काम करीत असल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात "मोक्का' अंतर्गत कलमांचा समावेश करुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव खडकी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त रमेश गलांडे यांनी परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्फत पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर आरोपींनी हा गुन्हा संघटीतपणे करुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करुन कट रचणे, फसवणूक, खंडणी या स्वरुपाचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार, चव्हाण यांनी "मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी दिली.