हडपसर परिसरात रात्री भाजी खरेदी- विक्रीला येणाऱ्यांनो सावधान...   

जनार्दन दांडगे
सोमवार, 29 जून 2020

पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ते हडपसर हद्दीतील पंधरा नंबर या दरम्यान रोज मागिल तीन महिण्यापासून रात्रीच्या वेळी रोज रात्री नऊ ते सकाळी सात या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला भाजीपाल्याचा अनधिकृत मोठा बाजार भरत आहे.

लोणी काळभोर (पुणे) : हवेली, पुरंदर व दौंड या तीन तालुक्यामधील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनो पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ते हडपसर हद्दीतील पंधरा नंबर या दरम्यान रात्रीच्या वेळी रस्त्यावर भाजीपाला विक्रीसाठी येणार असाल तर सावधान...कारण, रस्त्यावर भाजीपाल्याची खरेदी-विक्री करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश लोणी काळभोर व हडपसर पोलिसांना हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिले. 

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

हवेली, पुरंदर व दौंड या तीन तालुक्यामधील भाजीपाला उत्पादक शेतकरी व शेतकऱ्यांकडुन भाजीपाला खऱेदी करणारे पुणे शहरातील व्यापारी, छोटे-मोठे भाजीपाला विक्रते यांच्या सोईसाठी मांजरी येथील उपबाजार दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत चालु ठेवण्यात य़ेणार आहे. पुणे शहरातील कोरोनाची भयानक परीस्थिती पाहता भाजीपाला विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांमार्फत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये, यासाठी वरील निर्णय घेण्यात आल्याची माहिती सचिन बारवकर यांनी दिली. 

शिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार

पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ते हडपसर हद्दीतील पंधरा नंबर या दरम्यान रोज मागिल तीन महिण्यापासून रात्रीच्या वेळी रोज रात्री नऊ ते सकाळी सात या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला भाजीपाल्याचा अनधिकृत मोठा बाजार भरत आहे. या ठिकाणी हवेली, पुरंदर व दौंड या तीन तालुक्यामधील हजारो भाजीपाला उत्पादक शेतकरी स्वतः भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी येतात. तर, भाजीपाला स्वस्त मिळत असल्याने शहरातील छोटे- मोठे भाजीपाला विक्रते खरेदीसाठी येतात. मात्र, शेतकरी व अथवा भाजीपाला खरेदी करणारे विक्रते यापैकी कोणीही मास्क वापरत नाहीत. तसेच, सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून कोरोना ग्रामिण भागात पोचू नये, यासाठी सचिन बारवकर यांनी वरील निर्णय घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action will be taken against those who buy and sell vegetables on the streets in Hadapsar