Pune : पार्किंगमध्ये गोडावून करणाऱ्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : पार्किंगमध्ये गोडावून करणाऱ्यांवर कारवाई

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात पार्किंगचा प्रश्‍न गंभीर झालेला असताना लक्ष्मी रस्त्यावरील काही व्यावसायिकांनी पार्किंगच्या जागेत गोडावून व इतर कामासाठी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावल्या जात असल्याने आज महापालिकेच्या बांधकाम विभागाने अशा सात दुकानांवर करावाई करून चार हजार चौरस फुटाचे अतिक्रमण काढले.

लक्ष्मी रस्त्यावरील इमारतींच्या बेसमेंट पार्किंगचा मान्य नकाशापेक्षा वेगळा वापर करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. या वेळी एक ब्रेकर, आणि चार गॅस कटरच्या साह्याने बांधकाम पाडण्यात आले. बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर कदम, कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता, उपअभियंत्यांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

महपालिकेने पंधरा दिवसात ट्युलीप इंजिनिअर्स यांच्या सहाय्याने सिटी पोस्ट चौक ते अलका टॉकीज चौक दरम्यानचे सविस्तर सर्वेक्षण करून बेसमेंट, पार्किंगचा मान्य नकाशापेक्षा वेगळा वापर करणाऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या. या भागात असणाऱ्या सात मिळकतींमधील दहा ठिकाणी बेकायदेशीर वापर करणाऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार आज कारवाई केली, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :Pune NewspuneParking