Vidhan Sabha 2019 : आरारारा...कोथरूडमधून महाआघाडीतर्फे प्रवीण तरडे रिंगणात?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

महाआघाडीने कोथरूड मतदारसंघाची जागा मित्रपक्षांना सोडली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही जागा लढवणार असल्याचे समजते. त्याकरिता उमेदवाराची चाचपणी सुरु झाली असून, त्याकरिता 'मुळशी पॅटर्न' फेम प्रवीण तरडे यांना विचारणा झाल्याचे समजते.

पुणे : महाआघाडीने कोथरूड मतदारसंघाची जागा मित्रपक्षांना सोडली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही जागा लढवणार असल्याचे समजते. त्याकरिता उमेदवाराची चाचपणी सुरु झाली असून, त्याकरिता 'मुळशी पॅटर्न' फेम प्रवीण तरडे यांना विचारणा झाल्याचे समजते.

तरडे हे वास्तव्यास कोथरूडमध्ये असले तर मूळचे मुळशी तालुक्यातील आहे. मात्र कोथरूडमध्ये त्यांचा चांगला वावर असून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते वारंवार सहभागी होत असतात. शिवाय मुळशी तालुक्यातील अनेक नागरिक कोथरूडला स्थलांतरीत झालेले आहेत, त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. हाच विचार करून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी तरडे यांना फोन केला होता. त्यावर त्यांनी उद्या 3 ऑक्टोबर दुपारपर्यंत वेळ मागितली आहे. त्यामुळे तरडे यांनी होकार दिल्यास भाजपचे पाटील यांच्या विरुद्ध मनसेचे किशोर शिंदे विरुद्ध प्रवीण तरडे असा तिरंगी सामना होऊ शकतो.

Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांनी घेतली प्रवीण तरडे यांची भेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Pravin Tarde may contest Vidhan Sabha From Kothrud Constituency Maharashtra Vidhan Sabha 2019