Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांनी घेतली प्रवीण तरडे यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारीची चर्चा असलेले 'मुळशी पॅटर्न'फेम अभिनेते प्रवीण तरडे यांची भाजपचे उमेदवार आणि पालकमंत्री   चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात बुधवारी सदिच्छा भेट घेतली.

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारीची चर्चा असलेले 'मुळशी पॅटर्न'फेम अभिनेते प्रवीण तरडे यांची भाजपचे उमेदवार आणि पालकमंत्री   चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात बुधवारी सदिच्छा भेट घेतली.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पाटील यांनी कोथरुडमधील मान्यवरांच्या भेटी घेतल्या त्या अंतर्गत ही भेट झाली. यावेळी प्रविण तरडे यांच्यासह विनोद सातव, स्नेहल तरडे आदी कला, साहित्य, मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी प्रविण तरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधत आपल्या कारकिर्दीत केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’मधून शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांच्या वाचा फोडल्याचे नमूद करत तरडे यांचे कौतुक केले.  

Vidhan Sabha 2019 : हवं तर मी ऑडिओ क्लिप ऐकवते : मेधा कुलकर्णी (व्हिडिओ)

कला, साहित्य, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवरही पाटील आणि तरडे यांच्यात यावेळी चर्चा झाली. यावेळी प्रविण तरडे यांनी त्यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’या चित्रपटाचे पोस्टर आणि पुस्तक चंद्रकांत पाटील यांना भेट दिले.

Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्गात विद्यमान आमदारांसमोर बंडखोरांचे आव्हान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leader Chandrakant patil met Actor Pravin Tarde Maharashtra Vidhan Sabha 2019