Video: अभिनेते सयाजी शिंदे यांनी विझवली कात्रज बोगद्याजवळची आग; व्हिडिओ व्हायरल

actor sayaji shinde extinguish fire near katraj tunnel
actor sayaji shinde extinguish fire near katraj tunnel
Updated on

पुणे : कात्रज नवीन बोगद्याजवळ असलेल्या डोंगरावरील झाडांना रविवारी सायंकाळी अचानक आग लागली. दरम्यान तेथून जाणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे व त्यांच्या मित्रानी तत्काळ तिकडे धाव घेऊन आग विझविन्याचे महत्वाचे काम केले. सयाजी शिंदे यांचा वणवा विझवतानाचा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

कात्रज नवीन बोगद्यालगत दोन्ही बाजूंनी डोंगर परिसर आहे. तेथे मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. अभिनेते सयाजी शिंदे व  त्यांचे मित्र रविवारी सायंकाळी पुण्याहून सातार्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी कात्रज बोगद्याजवळ टेकडीवरील झाडांना आग लागल्याचे  त्यांच्या निदर्शनास आले. शिंदे यांनी कुठल्याही मदतीची वाट न पाहता थेट आगीच्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या मित्राच्या मदतीने काही वेलानंतर ही आग विझवण्यात त्यांना यश आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अग्निशामक दलाला माहितीच नाही!
दरम्यान, कात्रज जवलील आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना मिळाली नव्हती.अग्निशामक दलाकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी आगीचा कॉल आला नसल्याचे सांगितले. दरम्यान, आग विझविल्यानंतर सयाजी शिंदे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनेची माहिती दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रांवर नागरीकांनी कौतुकाचा वर्षाव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Marathi News Esakal
www.esakal.com