मराठी अभिनेत्रीनं केली शिवसेना नेत्यांकडं माफीची मागणी; पाहा व्हिडिओ

टीम ई-सकाळ
रविवार, 12 जानेवारी 2020

पूर जिल्ह्यात प्रचारासाठी शिवसेनेनं भाग्यश्री मोटे या अभिनेत्रीला बोलवलं होतं. मिथुन खोपडे यांनी तिला निमंत्रित केलं होतं.

पुणे : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिनं सोशल माडियावर एक व्हिडिओ शेअर करून, शिवसेनेच्या नेत्याला लक्ष्य केलंय. नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रपूर जिल्ह्यात बोलवण्यात आलं. पण, तिला सन्मानाजनक वागणूक मिळाली, त्यामुळं त्या नेत्यानं माझी आणि माझ्या सहकारीची माफी मागावी, अशी मागणी भाग्यश्रीनं केलीय. मिथून खोपडे, असं त्या शिवसेना नेत्याचं नाव, असल्याचं तिनं व्हिडिओत जाहीर केलंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहेत भाग्यश्रीचे आरोप?
निवडणूक प्रचारासाठी एखाद्या सेलिब्रेटिला बोलवणं काही नवीन नाही. सध्या नगरपरिषदांच्या निवडणुका काही ठिकाणी होत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात प्रचारासाठी शिवसेनेनं भाग्यश्री मोटे या अभिनेत्रीला बोलवलं होतं. मिथुन खोपडे यांनी तिला निमंत्रित केलं होतं. पण, मुंबईहून नागपूर विमानतळावर उतरल्यापासून कोणत्याही प्रकारची सुविधा न दिल्याचा आरोप भाग्यश्रीनं केलाय. नागपुरातील हॉटेलमध्ये व्यवस्था केली नाही. त्यानंतर चंद्रपुरात जे हॉटेल सांगण्यात आलं तिथं रुम उपलब्ध नव्हती. त्यामुळं एका छोट्याशा हॉटेलवर व्यवस्था केली. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी रिटर्न तिकिटची विचारणा केली असता, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच तुमची बदनामी होईल, असा इशारा देण्यात आला. कार्यक्रमस्थळी अडीच तास वेळ दिल्यानंतरही पुन्हा उशिरापर्यंत थांबण्याचा आग्रह करण्यात आला. रात्रीची राहण्याची किंवा विमानप्रवासाची कोणतिही माहिती देण्यात आली नाही आणि शेवटी एका गेस्ट हाऊसवर सोय करण्यात आली, असं भाग्यश्रीनं व्हिडिओमध्ये म्हटलंय. कलाकरांनी मिथून खोपडे यांच्याशी संपर्क साधताना काळजी घ्यावी, अशा स्वरूपाचं आवाहनही भाग्यश्रीनं केलयं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

One incident from my event.

A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on

आणखी वाचा - अनुराग कश्यपची पंत्र भाजपनं केली लिक, वाचा काय घडलं?

कोण आहे मिथून खोपडे?
मिथून खोपडे हा शिवसेनेचा विधानसभा संपर्कप्रमुख असल्याचं भाग्यश्रीनं म्हटलंय. मिथून खोपडे हा मुंबईतच मालाडला राहतो, अशी माहितीही तिनं दिलीय. शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा विदर्भ संपर्कप्रमुख शिवशाही व्यापारी संघ, असं मिथूनचं पद आहे. भाग्याश्रीनं केलेले आरोप मिथूननं फेटाळल्याचं टीव्ही-9 या वृत्तवाहिनीनं म्हटलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress bhagyashree mote video against shiv sena leader mithun khopde