esakal | प्रिया बेर्डे यांची राजकारणात एंट्री; पुण्यात होणार पक्षप्रवेश 
sakal

बोलून बातमी शोधा

actress priya berde to join politics nationalist congress party

प्रिया बेर्डे 'सकाळ'शी बोलताना म्हणाल्या, "पडद्यामागचे कलाकार, तसेच तंत्रज्ञ तसेच अनेक चित्रपट बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी भरीव करण्याची माझी इच्छा आहे.'

प्रिया बेर्डे यांची राजकारणात एंट्री; पुण्यात होणार पक्षप्रवेश 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील 'निसर्ग' येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

 बेर्डे यांच्या समवेत अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुहासिनी देशपांडे कार्यकारी निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक अभिनेते डॉक्टर सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपट मउहामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, हे सर्वजण राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागांमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

या प्रवेशाबाबत प्रिया बेर्डे 'सकाळ'शी बोलताना म्हणाल्या, "पडद्यामागचे कलाकार, तसेच तंत्रज्ञ तसेच अनेक चित्रपट बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी भरीव करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट व सांस्कृतिक  विभाग हा उपयुक्त ठरू शकतो, असे मला वाटते. तसेच त्यामुळे चित्रपट निर्मात्यांच्या तसेच चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवू शकते, असा मला विश्वास आहे."

आणखी वाचा - पुण्यात एक व्यवसाय लॉकडाउनमध्येही तेजीत

यासाठी पुणे शहर हे मला फार महत्त्वाचे वाटते. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचे कामही पुणे शहरातून सुरू झाले तसेच माझ्या मुलांचे शिक्षणही पुण्यातून झाले आहे. माझे हॉटेलही 'चखले' हे पुण्यात बावधनमध्ये आहे. त्यामुळे या शहरातून माझ्या नव्या कारकीर्दीची सुरुवात करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन मला मोलाचे ठरू शकते. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे मी ठरवले आहे , असे त्यांनी सांगितले. 

यापुढच्या काळामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रश्न समाजापुढे म्हणून त्यांची सोडवणूक करण्याचा माझा प्रयत्न असेल. कोरोनाचा काळ असला तरी काही गोष्टी या नंतरच्या काळात होऊ शकतात, यावर माझा विश्वास आहे आणि त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील, यांनी या प्रवेशाबाबत आनंद व्यक्त केला असून बेर्डे यांनी त्यांच्या उद्दिष्टासाठी योग्य प्लॅटफॉर्म निवडला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही या बद्दल समाधान व्यक्त करून मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कायम त्यांच्या पाठिशी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.