

CM Samruddha Panchayat Raj Abhiyan Adachiwadi Tops Maharashtra Rankings Pune Zilla Parishad Achieves Second Position in the State
esakal
-नरेंद्र साठे
पुणे: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळविले. तर पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. जिल्ह्यातील २७६ ग्रामपंचायतींचा सहभाग, करवसुली, लोकसहभागातून निधी उभारणी, जलस्रोतांचे बळकटीकरण, वृक्षलागवड आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर जिल्हा परिषदेकडून भर देण्यात आला.