

Adani Project Cost Reduction Hydropower Project
esakal
Adani Forest Conservation Fund : सातारा जिल्ह्यातील १,५०० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचा खर्च ५,६७५ कोटींवरून थेट ५६.७५ कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव अदानी ग्रीन एनर्जीने दिला आहे. खर्चातील या कपातीमुळे वन्यजीव संवर्धनासाठी कंपनीला भरावी लागणारी रक्कमही २२७ कोटींवरून २.२७ कोटी रुपयांवर आली आहे. या निर्णयावर आक्षेप घेत तक्रार दाखल झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्य वन विभागाला प्रकरणाची प्राधान्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.