Pune News : ‘एआरएआय’तर्फे ‘ॲडास’ची यशस्वी चाचणी; टाकवे येथे देशातील पहिली ‘अ‍ॅडास सिटी’ सज्ज

ADAS test city India : पुण्यातील तळेगावजवळ एआरएआयने उभारलेल्या ‘अॅडास टेस्ट सिटी’ची यशस्वी चाचणी पार पडली. भारतीय रस्त्यांवर वाहतुकीच्या प्रत्यक्ष परिस्थितीत वाहनांच्या प्रगत चालक सहाय्य प्रणालीची सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात चाचणी आता शक्य झाली आहे.
ADAS test city India

ADAS test city India

sakal

Updated on

पुणे : तळेगावजवळील टाकवे येथे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘अॅडास टेस्ट सिटी’ या प्रकल्पाची गुरुवारी यशस्वी चाचणी झाली. भारतीय रस्ते आणि रहदारीच्या स्थितीनुसार वाहनांच्या प्रमाणीकरणासाठी विकसित करण्यात आलेले हे देशातील पहिले आभासी शहर आता वापरासाठी सज्ज झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com