बालगृहातील अनाथांना कुटुंबाशी जोडा - प्रवीण घुगे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

अनाथाश्रम मुक्त समाजाची बांधणी आपण करायला हवी. त्यासाठी प्रतिपालकत्व, मुलांचे प्रायोजकत्व यापुढे जाऊन अनाथांना वर्षातून चारदा कुटुंबात राहण्यासाठी आणणे असे उपक्रम करायला हवेत. समाजानेही यासाठी पुढे येणे आवश्‍यक आहे.
- प्रवीण घुगे, अध्यक्ष, बालहक्क संरक्षण समिती. 

पुणे - मुलांचा विकास हा कुटुंबाशी जोडलेला असतो. मुलांच्या विकासासाठी कुटुंबातील आपलेपण आणि त्याचे प्रकटीकरण महत्त्वाचे असते. कुटुंबापासून वंचित असलेल्या बालगृहातील अनाथ मुलांनाही आपल्या कुटुंबात काही काळ का असेना, जोडणे आवश्‍यक आहे, असे मत बालहक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डेक्कन जिमखाना येथे ‘स्नेहालय’ संस्था आणि बालहक्क समितीच्या वतीने आयोजित अनाथ बालकांच्या हक्‍कांविषयीच्या एका परिषदेत ते बोलत होते. या वेळी सीइआरआयचे संचालक इयान आनंद, मिलिंद कुलकर्णी, अमित गुळवलेकर, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

वाहनांच्या खरेदीला लागला ‘ब्रेक’

घुगे म्हणाले, ‘‘परंपरा आणि संस्कृतीला वास्तवाशी जोडायला हवे. नवरात्रीमध्ये आम्ही कुटुंबामध्ये अनाथ मुलींना राहण्यासाठी आणले होते. त्या मुलींसाठी कुटुंबात राहण्याचा हा पहिलाच अनुभव होता. निश्‍चितच या अनुभवाने त्यांच्यासह आम्हीही समृद्ध झालो. समाजातील कुटुंबांनी अनाथ मुलांचे प्रतिपालकत्व किंवा प्रायोजकत्व स्वीकारणे गरजेचे आहे.’’ ‘अनाथ मुलांचे कुटुंबासमवेत संगोपन’ अशा विषयातील आशियातील ही पहिलीच परिषद असल्याचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Add orphans to child care homes pravin ghuge