esakal | पुणे : रुबल अग्रवाल यांची बदली, बिनवाडे नवे अतिरिक्त आयुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Binwade

पुणे : रुबल अग्रवाल यांची बदली, बिनवाडे नवे अतिरिक्त आयुक्त

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पुणे - पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल (Rubal Agarwal) यांची एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्तपदी बदली (Transfer) झाली आहे. तर जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवाडे (Ravindra Binwade) हे नवे अतिरिक्त आयुक्त असणार आहेत. राज्य शासनाने आज (ता. १३) सायंकाळी हे बदलीचे आदेश काढले. (Additional Commissioner Rubal Agarwal Transfer Ravindra Binwade)

रुबल अग्रवाल या १ जानेवारी २०१९ पासून पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. पुण्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना त्यावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिवाजीनगर येथील जम्बो कोवीड रुग्णालय चालविणे, आॅक्सिजन प्लांटची निर्मिती, मनपा रुग्णालयांचे व्यवस्थापन करणे, कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सुसूत्रता आणणे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी आरोग्य व्यवस्था निर्माण करणे अशी महत्त्वाची कामे अग्रवाल यांनी पार पाडली.

हेही वाचा: राज्यात नव्या पाच कारागृहांचा प्रस्ताव; शिकागोच्या धर्तीवर होणार बांधणी

दरम्यान गेल्या दिवसांपासून बदलीची शक्यता वर्तवली जात होती, त्यानुसार हे आदेश काढण्यात आले आहेत. जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवाडे हे नवे अतिरिक्त आयुक्त असतील. बिनवाडे हे मुळचे बीडचे असून, ते २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यापूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्यानंतर त्यांनी मुंबई व पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत होते.

‘पुणे महापालिकेत मला जी जबाबदारी दिली ती समर्थपणे पार पाडली. लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा भविष्यात देखील फायदा होईल.’

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त

loading image