esakal | गणेशोत्सवासाठी पीएमपीच्या जादा ६०० बस
sakal

बोलून बातमी शोधा

Additional PMP bus for Ganeshotsav

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने जादा ६०० बस गाड्यांचे नियोजन केले आहे.

गणेशोत्सवासाठी पीएमपीच्या जादा ६०० बस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने जादा ६०० बस गाड्यांचे नियोजन केले आहे. रात्री दहा ते मध्यरात्री गर्दी संपेपर्यंत या जादा बस सुरू राहणार आहेत. त्यासाठी नेहमीपेक्षा प्रति प्रवासी पाच रुपये जादा प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. विसर्जनाच्या दिवसापर्यंत ही ‘रातराणी’ बससेवा सुरू राहणार आहे. जादा बससेवेसाठी कोणतेही पास प्रवाशांना वापरता येणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी गरजेनुसार कात्रज-निगडी मार्गावरील बससेवा सुरू राहणार आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार या मार्गावर बसच्या फेऱ्या वाढविण्यात येतील. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी म्हणजे १२ सप्टेंबर रोजी स्वारगेट स्थानक बंद राहणार असल्यामुळे त्या दिवशी शाहू महाराज स्थानक, नटराज स्थानक, शंकरशेठ रस्त्यावरील पीएमपीच्या स्थानकावरून बससेवा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

फुकट्या प्रवाशांना  ३०० रुपये दंड 
गणेशोत्सवात पीएमपीच्या बसला प्रवाशांची गर्दी वाढते, हे लक्षात घेऊन तिकीट तपासणीसाठी पीएमपीने १२ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. महत्त्वाचे थांबे, स्टेशन आदींचा त्यात समावेश आहे. दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत पीएमपीची तिकीट तपासणी पथके कार्यान्वित राहणार आहेत. त्यात १६० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विनातिकीट प्रवाशाला ३०० रुपये दंड होणार आहे. त्याच्याकडे दंडाची रक्कम नसल्यास पोलिसांकडे गुन्हा दाखल करून त्या प्रवाशाला अटक होऊ शकते, असेही पीएमपी प्रशानाने स्पष्ट केले आहे.

loading image
go to top