इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापती पदी आदिनाथ धायगुडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे नूतन सभापती आदिनाथ धायगुडे, उपसभापती रामचंद्र शिंदे व संचालक मंडळाचा सत्कार करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक जाधव. सोबत माजी सभापती दत्तात्रेय तोरसकर, नानासाहेब नरुटे व मान्यवर.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापती पदी आदिनाथ धायगुडे

इंदापूर : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापती पदी आदिनाथ धायगुडे तर उपसभापती पदी रामचंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक जाधव यांनी नुतन सभापती,उपसभापती व संचालकांचा सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुकासहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांनी संस्थेच्यासभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी नुतन संचालक मंडळाची बैठक बोलावली होती.यावेळी अनुभवी संचालक म्हणून आदिनाथ धायगुडे यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी शिक्षक भारतीचे युवक नेते रामचंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सभापती पदा साठी श्री. धायगुडे व उपसभापती पदा साठी श्री. शिंदे यांच्या विद्यमान संचालक बालाजी कलवले यांनी मांडलेल्या सुचनेस संचालक संतोष गदादे यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.

यावेळी नूतन सभापती आदिनाथ धायगुडे म्हणाले ,सर्वसामान्य सभासद शिक्षक बंधू-भगिनींच्या हितास तसेच पारदर्शी कारभारास सर्वोच्चप्राधान्य दिले जाईल.निवडणुकीनंतर विकासकारण या तत्त्वाने सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल अशी ग्वाही नूतन उपसभापती रामचंद्र शिंदे यांनी दिली. यावेळी पॅनल प्रमुख नानासाहेब नरुटे म्हणाले, आम्ही निवडणुकीत दिलेली ४४ आश्वासने येत्या पाच वर्षात पूर्ण करण्यासाठी कटिबध्द असून नुतन २१ संचालक हे विविधसंघटनांचेपदाधिकारी आहेत. आम्ही एकत्रित संस्थेच्या नाव लौकिकात निश्चित भर घालू.

यावेळी पतसंस्थेचे माजी सभापती दत्तात्रेय तोरसकर, शिक्षक भारतीचे सतीश शिंदे, मागास वर्गीय शिक्षक संघटनेचे सुहास मोरे,इब्टाचेअध्यक्ष सहदेव शिंदे,मिलिंद देटगे,कैलास वणवे,सुरेश पांढरे, सर्जेराव मारकड, प्रशांत भिसे,दीपक भोंग,तुकाराम भोसले,मंगेश शेंडे, बाळासाहेब चव्हाण,शेखर मिसाळ,सचिन वारे,महेश थंबद, सचिन वणवे,संजय वणवे,सुभाष वणवे,संतोष घोडके उपस्थित होते.सुञसंचालन संतोष गदादे तर आभार प्रदर्शन सुहास मोरे यांनी मानले.

Web Title: Adinath Dhayagude Chairman Of Indapur Taluka Primary Teachers Co Operative Credit Society Unopposed Election Ramchandra Shinde Deputy Speaker

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top