आदित्य ठाकरे म्हणतात,'पंतप्रधानांनी केलेले कौतुक म्हणजे व्हिटॅमिन'

aaditya-thackeray
aaditya-thackeray

पुणे- कोरोच्या संकटाला महाराष्ट्र ज्या पद्धतीने सामोरे जात आहे त्याच कौतुक सर्वोच्च न्यायालय व देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः केले आहे. या कौतुकाचे व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारने योग्य निर्णयामुळे व नागरिकांच्या सहकार्याने साथ आटोक्यात आली आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. कात्रज येथील कै.ताराबाई हनुमंत थोरवे लाइफ केअर हाॅस्पिटलचे कोविड केअर सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. खासदार संजय राऊत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक उपनेते

रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा, सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवण्यासाठी ५० ऑक्सिजन बेड, ७० आयसोलेशन बेड, १ व्हेंटिलेटर असे हे ४ मजली कोविड केअर सेंटर उभे केले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, अॅड. संभाजी थोरवे, कल्पना थोरवे, हरिश अगरवाल यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात जनतेसाठी दिवस-रात्र काम केले तरी वेळ अपुरा आहे. शिवसैनिकांनी सुरू केलेले कोवीड सेंटर लोकांना उपयुक्त ठरेल.’’

aaditya-thackeray
"जे 'मुंबई मॉडेल'वर हसतात, त्यांना माहिती कशी देऊ?"

संजय राऊत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील या परिस्थितीचा अभ्यास केला आणि त्यावर शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहेत. असा अभ्यास इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केला असता तर तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. केंद्राने किंवा केंद्रातील आरोग्य विभागाने काय केले माहीत नाही, पण सर्वोच्च न्यायालयाने ज्या टास्कची निर्मिती केली तो टास्क महाराष्ट्राने गेल्या वर्षभरापासून राबवला आहे. त्यामुळे आपले जगभर कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com