जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी निधी देणार- आदित्य ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन व मलनिस्सारण प्रकल्प व्यवस्थित राबवावेत. पाणी प्रदूषण रोखण्यासाठी मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्यांच्या स्वच्छतेवर भर देवून जायका प्रकल्प प्रभावीपणे राबवावा. तसेच, जिल्ह्यातील हेरिटेज वास्तू आणि पर्यटनस्थळांचे सौंदर्य वाढवून पर्यटन विकासासाठी निधी मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. 

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन व मलनिस्सारण प्रकल्प व्यवस्थित राबवावेत. पाणी प्रदूषण रोखण्यासाठी मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्यांच्या स्वच्छतेवर भर देवून जायका प्रकल्प प्रभावीपणे राबवावा. तसेच, जिल्ह्यातील हेरिटेज वास्तू आणि पर्यटनस्थळांचे सौंदर्य वाढवून पर्यटन विकासासाठी निधी मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील आयसीसी ट्रेड टॉवर बुधवारी (ता.29) विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर आदी या वेळी उपस्थित होते.

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

जिल्ह्यात शिवनेरी, सिंहगड, शनिवारवाडा अशा ऐतिहासिक वास्तू आणि महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत. याठिकाणी विविध उपक्रम राबवून त्यांचे जागतिक पातळीवर महत्व वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी आवश्‍यक सोयी सुविधांसाठी लागणाऱ्या निधीचा सविस्तर प्रस्ताव संबंधित विभागांनी सादर करावा, जेणेकरुन निधीची तरतूद करता येईल.

INDvsNZ : तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडची सुपर ओव्हरमध्ये बाजी

लोकसहभागातून "प्लॅस्टिक पिशवी मुक्त महाराष्ट्र संकल्प अभियान' यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. सिंगल युज प्लॅस्टिक वापरास पूर्ण बंदी असल्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होईल. तथापि पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक पाऊच याबरोबरच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापनावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray will give fund for tourism development of Pune district