

junnar naneghat pumped storage hydropower project tribal protest public hearing
Sakal
जुन्नर: जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील नाणेघाट परिसरातील अंजनावळे व घाटघर येथे प्रस्तावित असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे आदिवासी भागात तीव्र संतापाची लाट उसळली असून या प्रकल्पाला आदिवासी भागातील नागरिकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. या प्रकल्पामुळे गोर गरीब आदिवासी नागरिकांच्या जमिनी जाण्यासोबतच त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ येणार असल्याचे आदिवासी समाजाच्या नेत्यांकडून बोलले जात आहे.