वाढत चाललेल्या कोरोनाग्रस्तांमुळे प्रशासनाने उचलले पाऊल; आरोग्यमंत्री म्हणाले...

Rajesh-Tope
Rajesh-Tope
Updated on

पुणे - कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यक बेड्स आणि वैद्यकीय सुविधा निर्माण कराव्यात. तसेच, नागरिकांना एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

पुणे विभागातील पुणे शहरासोबतच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी प्रशासनाच्यावतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत ससून रुग्णालयात सोमवारी आढावा घेतला. 

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता मुरलीधर तांबे, निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ.सुभाष साळुंके आदी या वेळी उपस्थित होते.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आरोग्य मंत्री टोपे म्हणाले...
- सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता
- एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व सेवा एकाच ठिकाणी द्यावात
- कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत
- आरोग्य विभागातील रिक्त पदाची भरती तातडीने करावी
- कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक सर्व सुविधा द्याव्यात
- डॉक्टर, नर्सेस आणि वार्डमधील सफाई कामगारांना आवश्यक सोयीसुविधा द्यावात
- विलगीकरण कक्षातील नागरिकांना जेवण, पिण्याच्या पाण्याची सोय करावी
- स्वच्छतागृह आणि परिसरातील साफसफाईकडे विशेष लक्ष द्यावे
- कोरोना संशयित रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com