पुणे विद्यापीठात Distance Learning MBA चे प्रवेश सुरू 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

​पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किमान दोन वर्षांचा कामाचा, व्यवसायाचा अनुभव असल्यास मुक्त अध्ययन प्रशाळेच्या "http://unipune.ac.in/SOL/' या संकेतस्थळावर एमबीए प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येणार आहे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमास दूरस्थ शिक्षण पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून (ता.15) सुरू होत आहे.

पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किमान दोन वर्षांचा कामाचा, व्यवसायाचा अनुभव असल्यास मुक्त अध्ययन प्रशाळेच्या "http://unipune.ac.in/SOL/' या संकेतस्थळावर एमबीए प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी सांगितले.

आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission to Distance Learning MBA starts at Pune University