esakal | आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal-Vidya

कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींच्या उत्पन्नात मोठी घट झाली. एकीकडे आर्थिक चणचण आणि दुसरीकडे हमखास उत्पन्नाचा मार्ग सापडत नसल्याने अनेकजण चिंताग्रस्त झालेले दिसतात.

आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींच्या उत्पन्नात मोठी घट झाली. एकीकडे आर्थिक चणचण आणि दुसरीकडे हमखास उत्पन्नाचा मार्ग सापडत नसल्याने अनेकजण चिंताग्रस्त झालेले दिसतात. पण आता चिंता करण्याचे कारण नाही. ‘सकाळ’ विद्या आणि ‘एसपी फायनान्स अकॅडमी ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी एका खास सेमिनारचे आयोजन केले जाणार आहे. यानिमित्ताने आर्थिक क्षेत्रात उत्तम करिअर करण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.

 रिअल इस्टेट, कर्ज वितरण, इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड अशा विविध आर्थिक क्षेत्रात आज भरपूर संधी उपलब्ध आहेत. होतकरू तरुण-तरुणी, गृहिणी, मध्यमवयीन अशा सर्व वयोगटातील मंडळींना त्याचा लाभ घेता येणार आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक न करता अल्पकाळात उत्पन्नाचा हमखास मार्ग येथे दाखविला जाणार आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये शिकविण्यासाठी अल्पकालीन कोर्सची आखणी करण्यात आली आहे. त्यानंतर थेट कमाईची दारे उघडली जाऊ शकतात. त्यामुळे या सेमिनारला येताना पालकांनी आपल्या मुला-मुलींना आणि मुलामुलींनी आपल्या पालकांना अवश्य सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘लर्न, अर्न अँड बी युअर बॉस’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून एसपी फायनान्स अकॅडमी ऑफ इंडियाचे काम चालते. यामागची भक्कम प्रेरणा आहे ती याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन बामगुडे यांची! शून्यातून विश्व उभे करणाऱ्या बामगुडे यांनी स्वतःच्याच रूपाने आर्थिक क्षेत्रात उद्योजकतेचा आदर्श उभा केला आहे. त्यांच्याकडे शिकलेले अनेकजण आज चांगली कमाई करून आर्थिक क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून काम करीत आहेत. 

वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल?

या सेमिनारमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत उद्योजकतेविषयी उपस्थितांसमोर मार्गदर्शन करणार आहे. तसेच प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ हे बामगुडे यांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांचा प्रेरणादायी प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखविणार आहेत.

मराठ्यांच्या ध्येयाचा पानिपतमध्ये विजय

‘व्यवसायाचा मार्ग शोधा’ 
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नोकरी केलीच पाहिजे, ही आपल्या पूर्वजांची शिकवण बदलण्याची वेळ आली आहे. कारण, आता कोणत्याच नोकरीत शाश्‍वती राहिलेली नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला निवृत्तीचे वय असते. त्यामुळे प्रत्येकाने व्यवसायाचा मार्ग शोधला पाहिजे. मात्र, यशस्वी व्यवसायासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज असते आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षणाची संधी ‘एसपी फायनान्स अकॅडमी ऑफ इंडिया’द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे.
- स्वप्नील जोशी, प्रसिद्ध अभिनेता व ब्रँड ॲम्बेसिडर

शिक्षक भरतीप्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये छापे

 • कोठे? - गणेश कला-क्रीडा रंगमंच (स्वारगेट) 
 • कधी? - रविवार, ता. १७ जानेवारी २०२१  
 • वेळ - सकाळी १०.३० वाजता 
 • वक्त्या - प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत
 • प्रकट मुलाखत - सचिन बामगुडे 
 • मुलाखतकार - सुधीर गाडगीळ 
 • मर्यादित विनामूल्य प्रवेश, नावनोंदणी आवश्‍यक 

(टीप - मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्‍यक)

कोणासाठी आहे सेमिनार? 

 • नवपदवीधर तरुण-तरुणी 
 • नोकरीच्या शोधात असणारे 
 • गृहिणी 
 • छोटे व्यावसायिक 

Edited By - Prashant Patil