आयटीआयच्या अॅडमिशन सुरु;अर्जातील बदलांसाठी सोमवारपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

- अर्जातील बदलांसाठी सोमवारपर्यंत मुदत
- दुसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी ३ डिसेंबरला होणार जाहीर

पुणे  :शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास वर्गाकरिता (एसईबीसी) आरक्षण न ठेवता या वर्गात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात येत असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थगित झालेली प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आयटीआयच्या दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना प्रवर्गात आणि महाविद्यालयाच्या पसंतीक्रमात बदल करण्यासाठी येत्या सोमवारपर्यंत (ता.३०) मुदत देण्यात आली आहे. तर दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

 '...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!​

राज्यातील आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या  विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी प्रत्येक खासगी आणि सरकारी संस्थेत येत्या सोमवारपर्यत रोज सकाळी १० ते ११ या वेळात नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक "https://www.dvet.gov.in" या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ४ डिसेंबरपर्यंत एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. विद्यार्थ्यांनी ५ ते ८ डिसेंबर दरम्यान मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेशाची कार्यवाही करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेतील प्रवेशाची तिसरी आणि चौथी फेरी १५ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आणखी एक संधी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत दिली जाणार आहे. 
 

येथे सर्व कामे विनामूल्य होतात...पोलिस ठाण्यातील पाटी चर्चेचा विषय

आयटीआय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक:
- प्रवेश प्रक्रियेचा तपशील : कालावधी
दूसरी प्रवेश फेरी
- दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे : ३० नोव्हेंबरपर्यंत (सायं ५ वाजेपर्यंत)
- गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : ३ डिसेंबर (सायं ५ वाजता)
- दुसऱ्या फेरीतील निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना एसएमएसद्वारे कळविणे : ४ डिसेंबर (सायं ५ वाजता)
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती आणि प्रवेशाची कार्यवाही करणे : ५ ते ८ डिसेंबर (सायं ५ वाजेपर्यंत)

तिसरी प्रवेश फेरी
- तिसऱ्या फेरीसाठी व्यवसाय स्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे : ५ ते ८ डिसेंबर (सायं ५ वाजेपर्यंत)
- निवड यादी प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना कळविणे : ११ डिसेंबर (सायंकाळी ५ वाजता)
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती आणि प्रवेशाची कार्यवाही करणे : १२ ते १५ डिसेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

चौथी प्रवेश फेरी
- चौथ्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे : १२ ते १५ डिसेंबर (सायं ५ वाजेपर्यंत)
- निवड यादी प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना कळविणे : १८ डिसेंबर (सायंकाळी ५ वाजता)
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती आणि प्रवेशाची कार्यवाही करणे : १९ ते २२ डिसेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

Corona Updates: ३५ दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा रुग्णांचा आकडा हजारापार!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission of ITI starts and Deadline for changes in application till Monday