विद्यापीठाकडून ललित संगीत व संगीत आस्वाद अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Admission of fine music and music savvy courses started from  university

विद्यापीठाकडून ललित संगीत व संगीत आस्वाद अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

पुणे - ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कल्चरल सेंटरच्या सहयोगाने संगीतविषयक दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केले आहे. अनेकांना गाणं गाण्याची आवड असते पण याची सुरुवात कुठून करावी याची माहिती नसते. संगीतातील मूलभूत गोष्टीची माहिती देणारा मराठी ललित संगीत अभ्यासक्रम हा सुरू केला आहे. यासाठी १५ ते ६० अशी वयोमर्यादा आहे.

संगीत आस्वाद कसा घ्यावा याचे बारकावे सांगणारा दुसरा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असून यासाठी वयाची कोणतीही अट नाही. या दोन्ही अभ्यासक्रमाची ही दुसरी बॅच असून विद्यार्थ्यांसोबत अनेक ज्येष्ठ मंडळीही याला प्रवेश घेतात.

मराठी ललित संगीत

ह्यात मराठी भावगीत, नाट्यसंगीत, भक्तिगीत, गझल, लावणीचा समावेश आहे. गायनासह आवाजसाधना, शब्दोच्चार, माइकचा वापर, नोटेशन, आदी बाबींची माहिती विविध तज्ज्ञ कलाकार विद्यार्थ्यांना देतात. अभ्यासक्रमाचा कालावधी पाच महिने असून हा अभ्यासक्रम ‘ब्लेंडेड मोड’मध्ये, म्हणजे प्रत्यक्ष व ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे होणार आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार असे ३ दिवस सायं. ५ ते ७ वर्ग होतील.

प्रवेश अर्जाची अंतिम तारीख १५ जुलै २०२२ असून दि. १८ जुलै २०२२ पासून वर्ग सुरु होत आहेत. प्रवेशअर्ज पुढील लिंकवर भरावा - https://forms.gle/z7SSpvzzxDDGv9Jq9

Web Title: Admission Of Fine Music And Music Savvy Courses Started From University

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top