esakal | डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 
sakal

बोलून बातमी शोधा

admission

राज्य सीईटी सेल मार्फत घेण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे अखेर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्य सीईटी सेल मार्फत घेण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे अखेर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे सर्वच अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडून गेले आहे. सीईटी सेल मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षाही तीन ते चार महिने पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. अनलाॅकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सीईटी सेल मार्फत सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात १० पेक्षा जास्त अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया पार पडल्या. सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली एमएचटी-सीईटी सोळा दिवस चालली होती. 

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; एक जागीच ठार तर चाैघे गंभीर जखमी

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेच निर्माण झाल्याने प्रवेश परीक्षा होऊन देखील सीईटी सेल कडून यापरीक्षांचा निकाल जाहीर केला जात नव्हता. एकीकडे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास होत असलेला विलंब आणि दुसरीकडे कायदेशीर कोंडी यामुळे विद्यार्थी व पालक हवालदिल झाले होते. राज्य सरकारने राज्यातील ठप्प झालेली शैक्षणिक प्रक्रिया सुरू प्रक्रिया सुरू सुरू करण्यासाठी 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर शैक्षणिक प्रवेशाचे दार उघडे झाले आहे. 

पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे तुफान वाहतूक कोंडी

गेल्या तीन दिवसात सीईटी सेलने जवळपास दहा ते बारा अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला. शनिवारी रात्री इंजिनीअरिंग, फार्मसी, ॲग्री या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया व त्याचे वेळापत्रक सीईटी सेल कडून सीईटी सेल कडून जाहीर होण्याची वाट पालक विद्यार्थी पाहत पाहत आहेत. दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होतील अशी माहिती दिली होती. त्यामुळे मंगळवारनंतर (ता. १ डिसेंबर) सीईटी सेल कडून याबाबत परिपत्रक काढले जाण्याची शक्यता आहे. 

इंजिनिअरिंग, फार्मसी, लाॅ, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड इतर अभ्यासक्रमांची प्रश्न आपल्या सुरू सुरू होतील, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top