पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे तुफान वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे तुफान वाहतूक कोंडी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कळंब (ता.आंबेगाव) येथे रविवार (ता. २९) सायंकाळी दुधाचा टँकर बंद पडला. त्यामुळे मंचर व नारायणगावच्या बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे तुफान वाहतूक कोंडी

महाळुंगे पडवळ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कळंब (ता.आंबेगाव) येथे रविवार (ता. २९) सायंकाळी दुधाचा टँकर बंद पडला. त्यामुळे मंचर व नारायणगावच्या बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं 

सलग तिन दिवस सुट्टया असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. कळंब बाह्यवळणाचे काम रखडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी कमी पडत आहे. त्यातच रविवारी सायंकाळी कळंब येथील घोडनदीच्या पुलावर दुधाचा टँकर बंद पडला आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहन कोंडी होत आहे. वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहण कोंडीत भर पडत होती.

स्थानिक ग्रामस्थांनी माहीती दिल्यानंतर मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सागर खबाले, आदिनाथ लोखंडे, राजेंद्र हिले यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतुक सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर एक तासानंतर ऐकेरी हळूहळू वाहतुक पुर्ववत सुरू झाली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 पुणे- नाशिक महामार्गावर एकलहरे ते कळंब हे अर्धा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी मोटार सायकल असूनही तब्बल एक तास लागला. त्यामुळे येथील प्रवास कंटाळवणा होत आहे. कळंब बाह्यवळणाचा प्रश्न सुटला नसल्याने अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर वाहनांचा ताण येतो. त्यामुळे वाहन कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे. सलग सुट्या आल्यानंतर नेहमीच त्रास होत आहे, असे ग्रामस्थ रविंद्र वर्पे यांनी सांगितले. 

loading image
go to top