भारतीय सैन्यदलाच्या 'जेएजी'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army Jag Entry
भारतीय सैन्यदलाच्या 'जेएजी'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

भारतीय सैन्यदलाच्या 'जेएजी'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे : भारतीय सैन्यदलाच्या वतीने 'जज एडवोकेट जनरल'च्या (जेएजी-२९) प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. ही प्रवेश प्रक्रिया विधीची पदवी असलेल्या पुरुष व महिला या दोन्ही उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे. येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

हेही वाचा: पुणे : कोरोनाच्या संकटाचा फायदा देशांतर्गत पर्यटनाला

या प्रवेश प्रक्रियेसाठी २१ ते २७ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच यामध्ये ९ रिक्त पदांची संख्या असून त्यातील सहा जागा पुरुषांसाठी तर तीन जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतीही लेखी परिक्षा होणार नसून उमेदवारांना थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीच्या माध्यमातून निवडण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना एलएलबीमध्ये किमान ५५ टक्के गुण असणे आवश्‍यक आहे. ही प्रक्रिया ऑक्टोबर २०२२ च्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येत आहे.इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तसेच या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीकरिता joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

Web Title: Admission Process For Indian Army Jag Entry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top