कृषी पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे कृषी विद्यापीठातील एम.एससी, एमटेक, एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

पुणे : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे कृषी विद्यापीठातील एम.एससी, एमटेक, एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, 21 सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. 20 ऑक्‍टोबर पासून वर्ग सुरू होणार आहेत, असे कृषी परिषदने स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत साधारणे पणे 27 महाविद्यालये असून, येथे 1 हजार 335 प्रवेश क्षमता आहे. या महाविद्यालयांमध्ये कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, मत्स्यविज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान, काढणी पश्‍चात व्यवस्थापन असे पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम शिकविले जातात.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.maha-agriadmission.in या संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करावी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे

अर्ज भरण्यासाठी मुदत ः 10 ते 21 सप्टेंबर
अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 24 सप्टेंबर
तक्रार नोंदणी : 25 ते 28 सप्टेंबर
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 30 सप्टेंबर
पहिल्या फेरीतील प्रवेश : 6ते 8 ऑक्‍टोबर
दुसऱ्या फेरीतील प्रवेश : 12ते 14 ऑक्‍टोबर
तिसऱ्या फेरीतील प्रवेश :19 ते 21 ऑक्‍टोबर
चौथी प्रवेश फेरीतील प्रवेश : 26 ते 27 ऑक्‍टोबर
वर्ग सुरू करण्याचा दिनांक : 20 ऑक्‍टोबर

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission process for postgraduate course of agriculture started