11 वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीत एवढ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्‍चीत; तर....

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

इयत्ता 11वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असली तरी तीन दिवसात केवळ केवळ 15 हजार 101 जणांनी प्रवेश निश्‍चीत केले आहेत. तर 18 हजार 900 जणांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीतीसाठी गुरूवार शेवटचा दिवस आहे, अशी माहिती इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मिना शेंडकर यांनी दिली.

पुणे - इयत्ता 11 वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असली तरी तीन दिवसात केवळ केवळ 15 हजार 101 जणांनी प्रवेश निश्‍चीत केले आहेत. तर 18 हजार 900 जणांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीतीसाठी गुरूवार शेवटचा दिवस आहे, अशी माहिती इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मिना शेंडकर यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे, पिंपरी-चिंचवड मधील कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. याप्रक्रियेत 304 महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीने 30 ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीत करणे आवश्‍यक आहे. पहिल्या फेरीसाठीच्या यादीत 40 हजार 13 विद्यार्थ्यांना समावेश असून, त्यात 19 हजार 575 जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

पुणे : 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग'पद्धतीनं सुरू झालंय भुयारी मेट्रोचं काम!

पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चीतीसाठी गुरूवार (ता. 3) शेवटचा दिवस असून आत्तापर्यंत 21 हजार 113 जणांनी प्रवेश घेण्यास संतमी दर्शविली आहे. त्यापैकी 15 हजार 101 जणांनी महाविद्यालयात शुल्क भरून प्रवेश निश्‍चीत केले आहेत.

पथ विक्रेते बनणार आत्मनिर्भर; विनातारण मिळणार १० हजारांचं कर्ज!

तर 18 हजार 900 जणांनी प्रतिसाद दिलेला नाही. शेवटच्या दिवशी प्रवेश निश्‍चीत केले जातील, त्यामुळे हा आकडा कमी होऊ शकतो. दरम्यान, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय न मिळणे, घरापासून लांब असणे यासह अन्य कारणांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. दुसऱ्या फेरीसाठी गुरूवारी वेळापत्रक जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Admission of so many students in the first round for 11th admission is fixed