esakal | पुणे : 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग'पद्धतीनं सुरू झालंय भुयारी मेट्रोचं काम!
sakal

बोलून बातमी शोधा

Austrian_tunneling_Method

या मार्गावर शिवाजीनगर, न्यायालय, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट येथे भुयारी मेट्रोची स्थानके आहेत. त्या ठिकाणी बोगद्याची उंची जास्त लागते. त्यामुळे तेथे टिबीएमला मर्यादा येतात.

पुणे : 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग'पद्धतीनं सुरू झालंय भुयारी मेट्रोचं काम!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड- स्वारगेट प्रकल्पासाठी भुयारी मार्गात 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड'ने बोगदा खणण्यास प्रारंभ झाला आहे. एकाच वेळी तीन ठिकाणी या पद्धतीने भुयारी मेट्रोचे काम सुरू झाले आहे.

पिंपरी-स्वारगेट मार्गावर रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान सुमारे साडेपाच किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. त्यात सध्या दोन टनेल बोअरींग मशीनद्वारे (टिबीएम) भुयार खोदण्याचे काम सुरू आहे. मात्र, टिबीएममुळे सुमारे सहा मीटर व्यासाचा बोगदा खोदला जातो.

विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू

या मार्गावर शिवाजीनगर, न्यायालय, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट येथे भुयारी मेट्रोची स्थानके आहेत. त्या ठिकाणी बोगद्याची उंची जास्त लागते. त्यामुळे तेथे टिबीएमला मर्यादा येतात. त्यासाठी 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड'चा वापर केला जातो. त्यात टिबीएमद्वारे सहा मीटर व्यासाचा बोगदा खोदून झाल्यावर स्फोटकांचा वापर करून बोगद्याचा आकार मोठा केला जातो. त्यानंतर तेथे यंत्रसामग्रीच्या मदतीने बोगद्याचा व्यास सुमारे मीटर रुंद केला जातो. त्या ठिकाणी स्थानकाची लांबी सुमारे 150 मीटर असते.

पथ विक्रेते बनणार आत्मनिर्भर; विनातारण मिळणार १० हजारांचं कर्ज!

बोगद्याचा व्यास वाढल्यावर तेथे बांधकाम करून स्थानकांच्या उभारणीला प्रारंभ केला जातो. स्थानकाची निर्मिती करण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागेल. त्यानंतर दोन्ही मार्गावरील बोगदे स्थानकाला जोडले जाता. त्यासाठी 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' वापरली जाते, अशी माहिती मेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली. भुयारी मेट्रोसाठी सध्या दोन टनेल बोअरींग मशीनद्वारे काम सुरू आहे. शिवाजीनगर न्यायालयापर्यंत त्यांचे काम पूर्ण झाले आहे.

या बाबत महामेट्रोचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ म्हणाले, ''न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' ही जगात सर्वत्र वापरली जाते. त्यात सुरक्षिततेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. सुमारे 15-20 कामगारांच्या ग्रुपने त्यात अहोरात्र काम केले जाते. या पद्धतीमुळे स्थानकांच्या उभारणीचे काम वेगाने होते.''

चारित्र्याच्या संशयावरून 'त्याने' पत्नीला पुलावरून नदीत ढकलले; संगमपुलाजवळ घडली घटना​

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या मेट्रोचे दोन मार्ग आहेत. त्यातील पिंपरी-स्वारगेट मार्गावर पहिल्या टप्प्यातील सुमारे सहा किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे उद्‌घाटन येत्या डिसेंबरमध्ये तर, वनाज-रामवाडी मार्गावर आनंदनगर ते गरवारे महाविद्यालय दरम्यान पाच किलोमीटरच्या मार्गाचे पुढील वर्षी मार्चमध्ये उद्‌घाटन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे मेट्रो प्रकल्पाचे काम रेंगाळले होते.

सध्याही पूर्ण क्षमतेने मेट्रोचे काम सुरू झालेले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी या बाबत आढावा बैठकीत आदेश दिल्यावर मेट्रोने पहिल्या टप्प्यातील प्रकल्पांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. मेट्रो प्रकल्प या पूर्वी 2022 मध्ये पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. मात्र, त्याची मुदत किमान सहा महिन्यांनी वाढण्याची सध्या चिन्हे आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image