

Pune University
sakal
पुणे - राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येरवडा येथील ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह’ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता अकरावी आणि बारावीच्या शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी या वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. मागासवर्गीय आणि गरजू विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.