

Pune Bar Association election results president Kaluram Bhujbal
esakal
पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) अध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी व चुरशीच्या लढतीत ॲड. काळुराम भुजबळ यांनी विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. विशाल शिवले यांचा ५९७ मतांनी पराभव केला. ॲड. भुजबळ यांना तीन हजार ८०७ मते मिळाली. बुधवारी (ता. ४) मतदार झाल्यानंतर गुरुवारी (ता.५) दुपारी एकपर्यंत मतमोजणीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.