‘तालिबानीस्तान’मुळे ड्राय फ्रूट आयातीला फटका

पुरवठा साखळी विस्कळित झाल्यास भाव वाढणार
Dry fruit
Dry fruit sakal

पुणे : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथून येणारी ड्राय फ्रूटची (सुका मेवा) आयात पूर्णतः थांबली आहे. भारतात सध्या ड्राय फ्रूटचा साठा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे भाव सध्या तरी स्थिरच आहेत. परंतु पुरवठा साखळी विस्कळित राहिली तर मात्र भारतात तेथून येणारे ड्राय फ्रूट्स आणि इतर वस्तू महागण्याची दाट शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. (pune news)

Dry fruit
राज ठाकरेंची UNCUT Press Conference; पाहा व्हिडिओ

अफगाणिस्तानातून भारतात अनेक गोष्टींची आयात केली जाते. या यादीत ड्राय फ्रूटची संख्या सर्वाधिक आहे. अफगाणिस्तानातून भारतात येणारा माल हा पाकिस्तानातून रस्ते मार्गाने जातो. मात्र, तालिबानने पाकिस्तान सीमेवरील मालाच्या वाहतुकीवर बंधने घातली आहेत. त्यामुळे आयात बंद झाली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात ड्राय फ्रूट्स आणि फळं आयात केली जातात. पुढील काही दिवसांत विविध सण येणार आहेत. त्यामुळे ड्राय फ्रूटची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. अफगाणिस्तानातून येणाऱ्या मालाची आयात पुढील काही दिवसांत व्यवस्थित सुरू झाली तर भाव वाढण्याचे कोणतेही कारण नाही. परंतु आयात बंदच राहिली तर मात्र दर वाढतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. भारत हा अफगाणिस्तानचा सर्वांत मोठा भागीदार आहे. २०२१ मध्ये भारतातून साधारणतः ८३५ मिलियन डॉलरच्या वस्तू निर्यात झाल्या आहेत.

Dry fruit
सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

घाऊक बाजारातील किलोचे भाव (रुपये) :

  • काळा मनुका - २५०-३५०

  • अंजीर- ६००- ८००

  • जर्दाळू - ३४० - ३८०

  • शहाजिरे- ४००-५००

  • खरजीरा- ४८०

  • किशमिश - २८० -६००

  • काळा बेदाणा- २६०

  • पिशोरी पिस्ता- १६५०

  • अबजोश - ४५० - ५००

Dry fruit
'सरहद' घेणार हजार अफगाणी विद्यार्थ्यांची जबाबदारी; PM मोदींना पत्र

भारतातून होणारी निर्यात:

चहा, कॉफी, साखर, तांदूळ, कांदा, फळे आणि भाजीपाला बियाणे, दुग्ध उत्पादने यासह विविध वस्तू

भारतात होणारी आयात:

मनुके, अक्रोड, बदाम, अंजीर, पाइन नट, पिस्ता, शहाजिरे, किशमिश, सुक्या जर्दाळू, सफरचंद, चेरी, खरबूज, टरबूज तसंच हिंग, जिरे, मसाले, केसर आदी

Dry fruit
भाजपला सत्तेचा माज आणि गुर्मी आहे; नाना पटोलेंची टिका

"देशातील अनेक भागात ड्राय फ्रूटचे दर कृत्रिमरीत्या वाढविले गेले आहेत. सध्या देशात अफगाणिस्तानातून येणाऱ्या ड्राय फ्रूटचा माल शिल्लक आहे. त्यामुळे दर सध्या तरी स्थिर आहेत. परंतु पुढील काही दिवसांत केंद्र सरकारच्या धोरणानंतरच दर वाढतील की नाहीत हे सांगता येईल."

- नविन गोयल, नवीन पेढी, मार्केट यार्ड.

"सध्या अफगाणिस्तानातून येणारा माल पूर्णपणे थांबला आहे. जो माल रस्त्यात आहे तो भारतात येईल. तेथील व्यवसाय करणारे व्यापारी आहेत ते सध्या ऑर्डर घ्यायला तयार नाहीत. अनेकांचे फोन बंद आहेत. आतापर्यंत बाजारात कोणतीही तेजी नाही. परंतु पुढील काही सण येणारे आहेत त्यामुळे बाजारात तेजी येऊ शकते. सरकारने याबाबत लवकर धोरण आखले तर दर स्थिर राहतील."

- विनोद गोयल, न्यू सच्चा सौदा, मार्केट यार्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com