
जुन्नर : (दत्ता म्हसकर) सीतेवाडी ता.जुन्नर येथील प्राचीन पांडवकालीन शिवालय-शितळेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता महसूल प्रशासनाच्या प्रयत्नातून बारा वर्षानंतर (बुधवार ता.२३) खुला झाला आहे. महादेव मंदिराकडे जाणारा हा सुमारे चारशे मीटर लांबीचा रस्ता अडवला गेल्याने स्थानिक ग्रामस्थ व भाविकांची मोठी गैरसोय होत होती.