

Long-Pending Property Issue Resolved: Ganga Village Society Celebrates Ownership Victory
esakal
-कृष्णकांत कोबल
हडपसर: हांडेवाडी रोड येथील गंगा व्हिलेज गृह रचना सोसायटीला करात सवलत मिळून सोसायटी आता जागेचीही मालक झाली असून स्वतः च्या साडेअकरा एकर जागेची मालकी संस्थेकडे आली आहे. नुकताच या जागेचा सातबारा संस्थेच्या नावावर झाला आहे. महसूल खात्याकडून राबविण्यात येत असलेल्या या धोरणाची ही सोसायटी हडपसर भागातील पहिली लाभार्थी ठरली आहे.